Manoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेत सांत्वन केले    बीडच्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झाडाला गळफास घेतलेला एक मृतदेह आढळून आला. अर्जुन कवठेकर असं या तरुणाचे नाव असून मराठा आरक्षणाची मागणी करत या तरुणाने आत्महत्या केली होती. दरम्यान घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन कवठेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.   आज सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एका लिंबाच्या झाडाला अर्जुन कवठेकर यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.. दिलेल्या शब्द पाळत नाही.. त्यामुळे मराठा बांधवांनी एकजूट व्हावे.. असा मजकूर लिहून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अर्जुन कवठेकर हे उखंडा गावचे रहिवासी असून ते खाजगी बसवर चालक होते. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram