Manoj Jarange Sajjad Nomani : मनोज जरांगे - सज्जाद नोमानी यांच्यात मध्यरात्री दोन तास चर्चा

Continues below advertisement

Manoj Jarange Sajjad Nomani : मनोज जरांगे - सज्जाद नोमानी यांच्यात मध्यरात्री दोन तास चर्चा

विधानसभा निवडणुकीत लढायचं की पाडायचं याचा अंतिम निर्णय आज मनोज जरांगे स्पष्ट करणार आहेत...मराठा समाजासोबत आज मनोज जरांगेंची निर्णायक बैठक होणार आहे... आज सकाळी  10 वाजता राज्यातील निवडक मराठा समाजातील लोकांसोबत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे बैठक घेणार आहेत... मनोज जरांगे यांचं 14 महिन्यांपासून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे... आतापर्यंत त्यांनी सहा वेळा अमरण उपोषण केलंय... आजच्या बैठकीतला निर्णय मनोज जरांगे दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर करणार आहेत 

मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची  भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे...निर्णायक बैठकीआधी घेण्या्त आलेली भेट महत्त्वाची मानली जातेय.. दरम्यान या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram