Manoj Jarange Maratha Reservation : 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्तारोको - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation : 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्तारोको  - मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल. मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram