Manoj Jarange Maratha Reservation : जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश
Manoj Jarange Maratha Reservation : जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश
शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत आंदोलनासाठी जाणारच असून, सर्व तयारी झाली आहे. सरकार आम्हाला धोका देत आहे, त्यामुळे आम्ही खूप सावध झालो आहेत. तसेच, सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी कावाने मुंबई गाठणार आहोत. अचानक लाखो लोकं येतील आणि तुम्ही देखील पाहत राहताल असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "गोडीने गुलाबीने तोडगा काढा, हे आंदोलन बंद पडणार नाही. शिष्टमंडळ आणि दुरुस्ती एवढंच मला पाठ झालय. त्यांच्याकडून त्रुटीच निघेना आणि उगच हिंडत आहेत. मी मॅनेज होत नाही हे तुमचं (सरकार) दुखणे आहे. पूर्वीचा मराठा राहिला नाही, आता देशव्यापी आंदोलनाची मागणी आहे. शिष्टमंडळाचा देखील आता कंटाळा आलाय, असे जरांगे म्हणाले.