Manoj Jarange, Bachchu Kadu : शेतकरी आंदोलन तीव्र, जरांगे-कडू एकत्र, सरकारला इशारा

Continues below advertisement
नागपूरमधील बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्त्वातील शेतकरी आंदोलनाला आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पाठिंबा दिला असून ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. 'शेतकऱ्यांसाठी ही अटीतटीची लढाई आहे, त्यामुळे, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे,' असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आज बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईत सरकारसोबत चर्चा करणार आहे. या चर्चेतून तोडगा न निघाल्यास ३१ ऑक्टोबर रोजी नागपुरात 'रेल रोको' करून आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे आणि आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola