Manoj Jarange Jalna : आमचं मन दुखावलंय, आता आम्ही बदला घेणार; मनोज जरांगे यांचा इशारा

Continues below advertisement

Manoj Jarange Jalna : आमचं मन दुखावलंय, आता आम्ही बदला घेणार; मनोज जरांगे यांचा इशारा #abpमाझा

Manoj Jarange: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेत्यांच्या जागा वाटपाचा चर्चा नाही वेग आलाय. दरम्यान अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बैठक घेतल्यानंतर ते पाडापाडीची भूमिका घेतात की निवडणुकीत स्वतःचे उभे राहतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

दरम्यान जालन्यात अंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. इच्छुक उमेदवार, राजकीय तज्ञांशी चर्चा आणि विधानसभेच्या जाहीर झालेल्या तारखा या निवडणुकीच्या पटावर जरांगे त्यांची भूमिका आज जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत आज बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन असा जरांगे म्हणाले. यावेळी सरकारवर जोरदार टीका करत कसा आरक्षण देत नाहीत बघूच.. सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही,असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram