Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंच आंदोलन, सरकारला टेन्शन?
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.. चौथ्या दिवशी जरांगेंचा बीपी आणि शुगर डाऊन झाल्याची माहिती आहे.. तराही जरांगेंनी उपचाराला नकार दिलाय.. आज अंबडचे तहसीलदार आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जरांगेंची भेट घेतली.. दुसरीकडे गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारला मराठ्यांबाबत प्रेम असतं तर चार चार दिवस उपोषण करुच दिलं नसतं, असं जरांगे म्हणालेत.
गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव सुरु असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अंतरवाली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. सरकारला मराठ्यांबाबत माया असती तर चार चार दिवस उपोषण करुच दिलं नसतं, असं जरांगे म्हणाले. तसंच आपण उपचार घेणार नसल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
Continues below advertisement