Manoj Jarange Full PC : ते आमचे विरोधक नाही, आम्ही ओबीसी नेत्यांविरोधात बोलणार नाही

Continues below advertisement

शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही.. सरकारवर विश्वास ठेवावा लागेल.. मागेपुढे सरकणे सुरू राहते, एक महिना त्यांना हवा होता दिला आता 13 जुलै पर्यंत काही बोलायचं नाही

हाके यांच्या उपोषणावर  :   लोकशाहीत सगळ्यांना अधिकर आहे, उपोषणाचा, त्यांच्या मागण्या बघू
ते आमचे विरोधक नाही... आम्ही ओबीसी नेत्यांविरोधात बोलणार नाही...गावखेड्यात त्यांचे आमचे जवळचे संबंध आहे...त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, जसे तुमचे लेकरं डोळ्यासमोर आहे तसे दुसरे लेकरं पण बघा,काळजावर हाथ ठेवून विचार करा,  जी लोक विरोधात येतात त्यांचा विचार आम्ही करत नाही करणार नाही, मुख्यमंत्री थोडं ना जातीचा असतो ते सगळ्यांचे असतात... 13 तारखेपर्यंत बोलायचं थांबू आम्ही,एक वर्ष झालं आंदोलनांना तरी  आम्ही आता 13 जुलै नंतर बोलू..

प्रकाश शेंडगे मागणी वर :  त्यांना काय बोलू मी, राहू महाराष्ट्र मध्ये सगळे उभे, तुम्ही तिकडून आम्ही इकडून, आणि ही ताकत त्यांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा ,रानावनात राहणाऱ्या धनगर साठी गोर गरिबांसाठी काम करा ना... विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकत लावा, गोर गरिबांसाठी काम करा... एस टी मधून धनगर बांधवांना आरक्षण साठी लढा ना... आम्हाला न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधव साठी लढा ना

ओबीसी आंदोलनवर : त्यांना उत्तर मी देणार नाही, माझा समाजाला मी आरक्षण मिळवून देण्यात खंबीर आहे.. हे आयोग आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत का... ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो की नाही ते सरकारला विचारावे...विरोधक मानले असते तर तोडीस तोड उत्तर दिले असते

माझा चित्रपट विरोध होतोय होऊ द्या मला त्यात रस नाही..माझं ध्येय एकाच माझ्या जातीसाठी आणि हिसका दाखवला  तर मी मग सरकारला आणि विरोधकाला ही कळेल...कुणाला कुठे कुणाला पडायचं तर पाडा, आम्ही पण बघू नंतर
समाज लढायला तयार आहे,13 जुलै पर्यंत वाट पाहू...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram