Manoj Jarange Beed Sabha : आजच्या सभेतून मनोज जरांगे सरकारला काय इशारा देणार

Continues below advertisement

Manoj Jarange Beed Sabha : आजच्या सभेतून मनोज जरांगे सरकारला काय इशारा देणार मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला  दिलेली २४ डिसेंबरची अंतिम मुदत उद्या संपणार आहे.. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे... आजच्या सभेतून जरांगे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या सभेतून ते सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे. सकाळी साडेनऊ वाजता मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयाहून मनोज जरांगे हे बीड शहरासाठी रवाना होतील... आणि दहा वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल... त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दुपारी दोन वाजता मनोज जरांगे यांच्या सभेला सुरुवात होईल.. मनोज जरांगे यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर  पोलीस सतर्क आहेत... आज बीड शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलीये... कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात आलीय़े...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram