Maratha Reservation | भुजबळ नाराज असले तरी मराठा आरक्षणाचा GR पक्का, जरांगेंचा टोला
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. छगन भुजबळ नाराज असले तरी सरकारने काढलेला अध्यादेश (GR) पक्का असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळाले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीवर भुजबळांनी बहिष्कार टाकला, याचा अर्थ हा GR पक्का आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. "काही चुकलं असेल तर पुन्हा GR काढायला लावू," असे त्यांनी सांगितले. तसेच, जर अध्यादेशात (GR) काही त्रुटी असतील तर मला लगेच सुधारित GR पाहिजे, अशी मागणी त्यांनी मंत्रिमंडळाकडे केली आहे. पन्नास हायकोर्टाचे वकील उपस्थित असताना GR ओके असल्याचे सांगण्यात आले होते, असेही जरांगे यांनी नमूद केले. मराठा समाजाचा विश्वास ढळू नये, असे आवाहन त्यांनी केले.