Manoj Jarange: विनापरवाना रॅली काढने मनोज जरांगेंच्या अंगलट, 12 जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
Manoj Jarange: विनापरवाना रॅली काढने मनोज जरांगेंच्या अंगलट, 12 जणांवर गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दौरा झाल्यानंतर विनापरवाना रॅली काढून जीसीबीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचं ठीक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आलं तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
Continues below advertisement