
Manoj Jarange - Devendra Fadnavis : जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
Manoj Jarange - Devendra Fadnavis : जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनांचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता, सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय. मात्र, मनोज जरांगे अजूनही समाधानी झालेले नसबन, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. उद्यापासून गावोगावी सकाळी १०.३० पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्लाही जरांगेंनी दिवाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीये. जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement