Manoj Jarange vs Dhananjay Munde : हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी; जरांगे-मुंडे वादाचा नवा अंक
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी खळबळ उडाली आहे. 'धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली,' असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेंनी दावा केला की, गोळ्या घालून, विष देऊन किंवा अंगावर गाडी घालून मारण्याचा पद्धतशीर कट रचण्यात आला होता. या कटात सुमारे १० ते ११ जण सामील असून, परळी आणि संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे आरोपींनी मुंडेंची भेट घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मुंडे यांनी स्वतःच्या, जरांगेंच्या आणि आरोपींच्या नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंगची मागणी केली असून, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची तयारी दर्शवली आहे. या वादामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement