Jarange vs Munde: 'माझ्या हत्येची अडीच कोटींची सुपारी', मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थेट आरोप

Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे', असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप देखील सादर केली. यावर, धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला. मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली असून, स्वतःची आणि जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची तयारीही दर्शवली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गेवराईमधून अमोल खुणे आणि विवेक गरुड या दोघांना अटक केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola