Manoj Jarange Ahmednagar : मनोज जरांगेंची अहमदनगरमध्ये शांतता रॅली
Manoj Jarange Ahmednagar : मनोज जरांगेंची अहमदनगरमध्ये शांतता रॅली
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज अहमदनगर (Ahmednagar) येथे शांतता रॅली होणार आहे. अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पारंपरिक मिरवणुक मार्गावरुन ही शांतता रॅली काढली जाणार आहे. पुढे चौपाटी कारंजा येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची तयारी कशी?
अहमदनगर शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि प्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. फटाकड्यांची आतिषबाजी होत आहे. 2500 प्रशिक्षित स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. तसेच या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर 'नो व्हेईकल झोन' तसेच पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था, ध्वनिक्षेपक, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आली आहे?
न्यू आर्टस् कॉलेज
क्लेराब्रूस हायस्कूल मैदान
फटाकडा मार्केट मैदान, कल्याण रोड
मार्केट यार्ड
मार्केट यार्ड समोरील फटाकडा मार्केट मैदान
नेमाने इस्टेट, केडगाव
गाडगीळ पटांगण