Manmohan Singh's Demise : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Continues below advertisement

Manmohan Singh's Demise : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत.  डॉ. मनमोहन सिंह  यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून घेतले. येथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले,तिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही मिळवली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram