Manmad Leopard Video : मनमाडमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Manmad Leopard Video : मनमाडमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिकच्या मनमाडमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे..दोन दिवसांपूर्वी बुधलवाडी, दरगुडे वस्ती भागात बिबट्याने तीन कुत्रे फस्त केले तर रात्री आय.यू.डी.पी.या भागातील गुरुद्वाराच्या शेत जमिनीमध्ये बिबट्या बदकाची शिकार करताना कैद झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे..बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे..

हे ही वाचा..

परभणीतील माळसोन्ना येथील एका तरूण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतावरील घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत परभणीच्या माळसोन्ना गावातील 35 वर्षीय तरुण शेतकरी सचिन जाधव यांनी (13 एप्रिल) विषारी औषध प्राशन केले होते, त्यांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी (दि.14) रात्री पत्नीनेही विष प्राशन केले. या महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.15) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. पतीपाठोपाठ पत्नीनेही आत्महत्या केल्याने नकळत्या वयात त्यांच्या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. या घटनेने कुटुंबासह गावात दुःखाचा डोंगर कोसळला. 

तरुण शेतकरी सचिन जाधव आणि पत्नी ज्योती सचिन जाधव (वय 30) असे मयत महिलेचे नाव आहे. ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन आणि ज्योती यांना दोन लहान मुले असून लहानपणीच वडील आणि आई यांचे छत्र हरवले आहे. दरम्यान या घटनेने माळसोन्ना गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडु आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आज आत्महत्या ग्रस्त दांपत्याच्या घरासमोर रक्तदान करत सरकारला इशारा दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola