ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 19 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 19 April 2025

यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला, साखळी करून विहिरीत उतरत पाणी भरण्याची वेळ, आतापर्यंत सहा ग्रामस्थांनी गमावलाय पाण्यासाठी जीव

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल बिघाडामुळे कसारा ते कल्याण मार्गावरही वाहतूक ठप्प, विविध स्थानकांवर गाड्या खोळंबल्या

हायकोर्टाचा मनाई आदेश असतानाही मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये महापालिकेनं जैन मंदिर पाडलं, जैन समाजाचं महापालिकेविरुद्ध आंदोलन

सोलापुरातील प्रसिद्ध  न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकरांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या...वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ...आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट...

दिल्लीमध्ये ऐन मध्यरात्री चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली आणखी ८ ते १० जण अडकल्याची भीती...

विकासकामांच्या निधीवरुन भाजपचे मंत्री अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांमध्ये कुरबुरी, मतदारसंघातल्या कामांना मंजुरी घेतली नाही म्हणून ती रद्द करा असं बोर्डीकराचं अतुल सावेंना पत्र...

पालकमंत्री अजित पवारांनी बोलावलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुप्रिया सुळे हजर राहणार नाहीत, दिल्लीत इन्कमटॅक्स बिलाची बैठक असल्यानं गैरहजेरी असेल असं ताईंचं दादांना पत्र...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola