Manisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदे
Manisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदे
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी या हत्येचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी यामध्ये तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध चालू आहे. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्याचा संशय व्यक्त केला जातोय. गुरमेलने केली होती सलमानच्या घराची रेकी मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही रेकी केली होती. आरोपी गुरुमेल सिंह याने मागच्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून आरोपी गुरमेल सिंह यांने गार्डनमध्ये त्याच्या मोबाईलचा डिसप्ले तोडला होता. हत्येचा कट स्नॅपचॅटमध्ये शिजला? सूत्रांच्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना सर्व माहिती स्नॅपचॅटच्या माध्यमातून दिली जायची. या अॅपमध्ये येणारे सर्व मेसेज वाचून आरोपी ते मेसेज लगेच डिलीट करायचे. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्ट याच अॅपवर पाठवण्यात आले होते. स्नॅपचॅटवर पाठवण्यात आलेल्या आधारकार्डचा स्क्रीनशार्ट काढून ते लगेच डिलिट करण्याच्या सूचना आरोपींना देण्यात आली होती. तशी कबुली आरोपींनी दिली आहे.