Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीकडून अभय? धक्कादायक माहिती समोर

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना अभय मिळत असल्याचा सवाल आता विचारला जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षातल्या एका नेत्यानं एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेत्यानं असं म्हटलं आहे की, "हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, त्यामुळे राजीनामा देणं कितपत योग्य आहे?" असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या भूमिकेमुळे कृषिमंत्री कोकाटे यांना पक्षाकडून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतरही पक्ष त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे यातून दिसून येते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola