Mumbai Rains : मुंबईत सकाळपासून तुफान पाऊस, अंधेरीच्या गुंदवली भागात पाणी ABP MAJHA

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुंदवली परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वांद्रे कडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गुंदवली जवळ हायवेवर पाणी भरले आहे. अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळच्या वेळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. अंधेरी सबवे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गुंदवली बस स्टॉपजवळ मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. वाहनचालक पाणी कमी असलेल्या बाजूने मार्ग काढताना दिसत आहेत. असाच जोरदार पाऊस सुरू राहिल्यास पश्चिम उपनगरातील इतर सखल भागांमध्येही पाणी भरायला सुरुवात होईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola