Mandangad Tulashi Ghat Landslide : मंडणगडमध्ये तुळशी घाटात कोसळली दरड, धडकी भरवणारी दृश्य

Continues below advertisement

Mandangad Tulashi Ghat Landslide : मंडणगडमध्ये तुळशी घाटात कोसळली दरड, धडकी भरवणारी दृश्य

मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना होत आहेत. 

इतर बातम्या :

पुण्यासह शहर परिसरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहर परिसरात असलेल्या गड किल्ल्यांवर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची संख्या वाढली आहे. मात्र, पावसामुळे गड किल्ले परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत, अशा परिस्थितीत पर्यटक आणि गिर्यारोहकांनी पायवाटेने जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सिंहगडाच्या (Sinhagad Fort) पायवाटेवर आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अशातच आज रविवार असल्याने गडावर पायी आणि वाहनाने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. 

सिंहगडावर जाणाऱ्या पाय वाटेवर अतकरवाडी जवळ संततधार पावसामुळे आज(रविवारी) पहाटे दरड कोसळली आहे .त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सिंहगड परिसरात (Sinhagad Fort) चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाय वाट असलेल्या भागात दरडी कोसळत (Landslide on Sinhgad) आहेत. पायवाटांवरून जाताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरायला जाताना जरा जपूनच जावे, काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram