Manache Shlok Film Name Controversy | 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या नावावरून वाद, ट्रेलर हटवण्याची मागणी
Continues below advertisement
मनाचे श्लोक या चित्रपटाच्या नावावरून सध्या एक नवीन वाद सुरू झाला आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडून चित्रपटाच्या शीर्षकाला विरोध केला जात आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रंथाच्या नावाचा वापर मनोरंजन किंवा काल्पनिक कथांसाठी नको, असे श्री समर्थ सेवा मंडळाने म्हटले आहे. विश्वस्त प्रवीण कुलकर्णी यांनी मनाचे श्लोकचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवून चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. अन्यथा भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. "हे आम्हाला अतिशय निंदनीय वाटतं. हे अतिशय चुकीचं आहे आणि हे त्वरित बंद करावं," असे प्रवीण कुलकर्णी यांनी म्हटले आहे. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशीही त्यांची मागणी आहे. यावर, चित्रपटाच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास स्वामी रचित काव्याचा कुठल्याही पद्धतीने अनादर करण्याचा हेतू नाही, अशी प्रतिक्रिया मनाचे श्लोक चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement