Congress On MNS Raj Thackeray नव्या भिडूची मविआला आवश्यकता नाही, काँग्रेसचा मनसेला विरोध
Continues below advertisement
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेदरम्यान राज ठाकरेंना महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, “संविधान बचाओ हा आमचा नारा असून नव्या भिडूकडेही संविधान बचावची विचारसरणी दिसून येत नाही.” त्यामुळे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसचा नकारात्मक सूर आहे. काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला नवीन भिडूची आवश्यकता नाही. संविधान बदलण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आणि 'मोदीरी' नावाच्या राक्षसाला धडा शिकवण्यासाठी इंडिया अलायन्सची स्थापना झाली होती. यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. जो संविधानाची बात करेल, तोच इंडिया अलायन्समध्ये राहील, अशी भूमिका आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement