Jalgaon Crime : धक्कादायक! कोंबडी खाल्ल्याच्या रागातून शेजाऱ्यांने घातली मांजरीच्या कपाळात गोळी
शेजाऱ्याच्या मांजरानं आपली कोंबडी खाल्ल्याच्या रागातून कोंबडीमालकानं मांजराला गोळी घालून ठार मारल्याची घटना जळगाव शहरातल्या योजना नगर भागात घडली आहे. पोलिसांनी हेमराज सोनवणे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हेमराज सोनवणे आणि पुष्कराज बानाईत हे दोघे शेजारी-शेजारी राहतात आणि हेमराज सोनवणे यांना कोंबड्या पाळण्याची तर बानाईत यांना मांजर पाळण्याची आवड आहेत. गेल्या काही दिवसांपासून बानाईत यांच्या माजरानं हेमराज सोनवणे यांच्या कोंबडीची पिल्ले फस्त केली होती आणि त्यामुळं सोनवणे यांना राग होता. रागाच्या भरात सोनवणे यांनी मांजराच्या पिलाला गोळी घालून ठार केल्याची अमानुष घटना समोर आली आहे.