Mamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

Continues below advertisement

Mamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

 90 च्या दशकात लाखो तरूणांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 24 वर्षांनी भारतात परतली. भारतात परतल्यानंतर मला फार आनंद झाला आहे, असं या अभिनेत्रीने म्हटलंय. भारतात येताच ममता कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी याच अभिनेत्रीचे नाव 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आले होते. त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली होती. 

ममता कुलकर्णी भारतात परतल्यावर काय म्हणाली? 

भारतात परतताच ममता कुलकर्णीने इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. "हाय मित्रांनो. मी ममता कुलकर्णी. मी तब्बल 25 वर्षांनी भारत, मॉम्बे, मुंबई, आमची मुंबईमध्ये आली आहे. मी फारच खूश आहे. या आनंदाला मी कशी व्यक्त करू हेच मला समजत नाहीये. मी फारच भावूक आहे. 24 वर्षांनी मी माझ्या देशाला फ्लाईटमधून पाहिलं आणि मी फारच भावूक झाले. माझ्या डोळ्यांत अश्रू होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर पाऊल ठेवताच मी फारच भावूक झाले," असं ममताने आपल्या या व्हिडीओत म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram