Mamata Banerjee : वाराणसीमधून प्रियांका गांधींनी PM Modi यांच्याविरोधात लढावं : ममता बॅनर्जी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMamata Banerjee : वाराणसीमधून प्रियांका गांधींनी PM Modi यांच्याविरोधात लढावं : ममता बॅनर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात, प्रियंका गांधी मैदानात उतरणार का? अशी चर्चा आता सुरू झालीय. कारण, वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात प्रियांका गांधी यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव ममता बॅनर्जींनी ठेवला. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव ठेवला. २०१९ मध्येही मोदींविरोधात वाराणसीतून प्रियांका गांधी लढतील असं सांगितलं जात होतं. त्यावेळी या लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र तेव्हा काँग्रेसने आयत्यावेळी अजय राय यांना मैदानात उतरवलं. आता यावेळी प्रियांका गांधींना पक्षाने उमेदवारी दिली तर मोदींना वाराणसीतून मोठं आव्हान निर्माण होऊ शकेल असं मत ममता बॅनर्जींनी मांडलंय. मात्र आता समाजवादी पार्टीने वेगळा सूर आळवलाय. उत्तर प्रदेशातल्या ८० जागांवर भाजपचा कोणी मुकाबला करू शकेल तर ते अखिलेश यादवच असं समाजवादी पार्टीचे अमीक जई यांनी म्हटलंय.