Melghat Malnutrition : 15 दिवसात 14 मुलं तर 2 गर्भवती मातांचा कुपोषणामुळे मृत्यू : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2021 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कुपोषणाची समस्या किती गंभीर आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आलाय. गेल्या 15 दिवसात अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग मेळघाटात 14 मुलांचा आणि 2 गर्भवती मातांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
कुपोषणासंदर्भातील विविध याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मेळघाटात सध्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी नेमके किती डॉक्टर्स आणि नेमकी काय वैद्यकीय सेवा हवी आहे याचा अभ्यास का करण्यात आला नाही? असा सवाल विचारत हायकोर्टाने विचारला आहे.