Mahapalikech Mahasangram Malegaon : पॉवरलूमची घरघर, निवडणुका तोंडावर, कोण होणार मालेगावचा महापौर?

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथील पॉवरलूम उद्योग (Powerloom Industry) सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. वाहतूक संप आणि मागणीतील घटीमुळे शहरातील लाखो विणकरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर, विणकरांनी मूलभूत सुविधांची मागणी केली असून, शासनाच्या योजना केवळ ऑटोमॅटिक मशिन्ससाठी (Automatic Looms) असल्याचा आरोप केला आहे. 'केंद्र सरकार ज्या योजना राबवतेय, त्या फक्त ऑटो मशीनसाठीच राबवते आहे आणि इथला कारखानदार एवढा कॅपेबल नाहीये की तो स्वतःच्या पैशाने ऑटो मशीन इथे लावू शकेल,' अशी खंत एका पॉवरलूम मालकाने व्यक्त केली. स्थानिक उद्योजकांना प्लेन पॉवरलूमसाठी (Plain Powerlooms) विशेष योजनांची अपेक्षा आहे, अन्यथा हा पारंपरिक व्यवसाय मोडीत निघण्याची भीती व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola