Malegaon Violence : मालेगावात आंदोलकांना भिडणाऱ्या DYSP लता दोंदेंची कहाणी

Continues below advertisement

त्रिपुरा मध्ये झालेल्या हिंसाचारा नंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून,मालेगाव मध्ये सुन्नी जमेतुल उलेमा आणि रजा आकाडमी तर्फे बंद पाळण्यात आला होता दुपारी तीन वाजे पर्यंत मालेगाव शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण असतांना चार वाजे नंतर निषेधाचे निवेदन देण्यासाठी संघटनेचे प्रमुख लोक जाणार असतांना त्यांच्या बरोबर शेकडोचा जमाव गोळा झाला या जमावातील काही लोकांनी संतप्त होत विविध ठिकाणी दगड फेक केली.पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.मात्र जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता.शहरातील जुन्या आग्रा महामार्गावरील नविन बस स्थानक ते शिवाजी पुतळा या दरम्यान मोठ्या संख्येने जमाव असल्याने पोलिसांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले असता जमावातील काही लोकांनी दगड फेक केल्या नंतर पोलिसांनी सुरवातील सौम्य लाठीमार केला आणि जमावाला पिटाळून लावले,जमाव पुन्हा नविन बस स्थानक परिसरातील पुला खाली जमलेला असतांना पुन्हा दगड फेक करण्यात आली यात काही पोलिस जखमी झाले,ही परिस्थिती लक्षात घेता मालेगाव शहराच्या डीवायएसपी लता दोंदे यांनी जमावाला काबूत ठेवण्यासाठी स्वत हातात रिव्हालवर घेऊन पुढे सरसावल्या आणि सोबतच्या पोलिसांनी त्यावेळी हवेत गोळीबार केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram