Malegaon Chalisgaon Accident : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात, 4जणांचा मृत्यू 12जण गंभीर जखमी
चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 जण ठार झालेत तर 12 हून अधिक जण जखमी झालेत. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला. सर्व अपघातग्रस्त चंदनपुरी येथील खंडेराव मंदिरात दर्शनासाठी आले होते. जखमींवर उपचार सुरू आहेत.