Malegaon Blast साध्वी प्रज्ञा,पुरोहितांच्या गौप्यस्फोटाने खळबळ Supriya Sule म्हणाल्या आरोप बिनबुडाचे
मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी कोर्टात दिलेली लेखी उत्तरे आता समोर आली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कर्नल पुरोहित यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी 'हिंदू दहशतवाद' असा शब्दप्रयोग केल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा कर्नल पुरोहित यांनी केला. तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि सहायुक्त परमवीर सिंग यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा आरोपही त्यांनी केला. साध्वी प्रज्ञा यांनी पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची नावे या षडयंत्रात गोवण्यास वारंवार दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्याला छळण्यात आल्याचा आणि वेश्या संबोधण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांवर तत्कालीन एटीएस अधिकारी परमबीर सिंग, सचिन कदम, रमेश कुलकर्णी आणि अरुण खानविलकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "शरद पवारांनी तो शब्द वापरला नाही हे मी तुम्हाला जबाबदारीकं मी ऐकलेला नाही, मी कुठे वाचलेलंही नाही." तसेच, हेमंत करकरेंबद्दल अशी भाषा वापरणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.