Terror Crackdown: फरीदाबादमध्ये जैश-ए-मोहम्मदचे स्लीपर सेल उद्ध्वस्त, दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये मोठी दहशतवादी कारवाई करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेश एटीएस, एनएसजी, आणि दिल्ली क्राईम ब्रांच सारख्या अनेक मोठ्या एजन्सी सहभागी झाल्या आहेत. ताज्या वृत्तानुसार, 'जैश-ए-मोहम्मदच्या स्लीपर सेलचा पर्दाफाश करत दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे'. ही कारवाई जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केली, ज्यात सुमारे ३६० किलो स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या घटनेमुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम करणारे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. संपूर्ण परिसरात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement