Naxal Surrender: छत्तीसगडमध्ये सर्वात मोठी कारवाई, ४ दिवसांत ४५० हून अधिक नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Continues below advertisement
छत्तीसगड (Chhattisgarh) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, सलग चार दिवसांत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आज, सलग चौथ्या दिवशी, छत्तीसगडच्या जगदलपूर (Jagdalpur) येथे २०८ हून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून भारतीय संविधान हाती घेतले, जे लोकशाही मूल्यांवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. १४ ऑक्टोबर रोजी २६, १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात ६१, १६ ऑक्टोबरला १७० आणि आज (१७ ऑक्टोबर) २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ही घटना म्हणजे नक्षलवादी चळवळीला बसलेला एक मोठा धक्का मानला जात असून, त्यामुळे उत्तर बस्तर आणि अबुझमाड परिसर नक्षलमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement