Mumbai Fire : 'इमारतीला OC नव्हती, तरी गोदामं-दुकानं सुरू', Jogeshwari आगीप्रकरणी MNS चा गंभीर आरोप

Continues below advertisement
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील (Jogeshwari West) जेएमएस बिझनेस सेंटरला (JMS Business Centre) लागलेली भीषण आग तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे. 'या इमारतीला ओसी (OC) नव्हती आणि तरीही गोदामं व दुकानं सुरू होती,' असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे, तसेच पालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आगीच्या या घटनेत इमारतीचे तीन ते चार मजले जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाने १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. जखमी झालेल्या दोन ते तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला सातव्या मजल्यावर लागलेली आग पाहता पाहता दहाव्या मजल्यापर्यंत पसरली. या प्रकरणी संबंधित विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola