Mumbai Fire: जोगेश्वरीमधील JNS टॉवरला OC नव्हती? 'पालिकेच्या दुर्लक्षामुळे आग' - स्थानिकांचा आरोप
Continues below advertisement
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील जेएमएस बिझनेस सेंटरला लागलेल्या भीषण आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले आहेत. या घटनेत पालिकेच्या दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, मनसेने गंभीर आरोप केले आहेत. 'इमारतीला ओसी नसतानाही गोदामं आणि दुकानं सुरू असल्याचा आरोप मानसेने केला आहे.' अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आणि इमारतीत अडकलेल्या सुमारे १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग सुरुवातीला सातव्या मजल्यावर लागली आणि पाहता पाहता दहाव्या मजल्यापर्यंत पसरली, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement