Solapur Mega Joining: सोलापूरमध्ये भाजपची मेगाभरती, निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ

Continues below advertisement
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये मोठी मेगाभरती झाली असून अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 'जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत, लवकरच सर्व काही स्पष्ट होईल,' असे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेनेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बिद्युत प्रधान आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनीही भाजपमध्ये घरवापसी केली आहे. या पक्षप्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपला मोठे बळ मिळाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola