Pune NCP Protest : पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Continues below advertisement
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 'काळी दिवाळी' आंदोलन करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. 'शेतकऱ्यांनी या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास दिवे बंद करून काळी दिवाळी साजरी करावी', असे आवाहन आंदोलकांनी केले आहे. अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पक्षाने म्हटले आहे. मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा गंभीर आरोपही करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी भाज्यांच्या माळा घालून सरकारचा निषेध केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola