Majha Vitthal Mazi Wari : संत तुकाराम महाराज ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अपडेट्स एका क्लिकवर

Continues below advertisement

रामकृष्णहरी माऊली 
म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत..

चलारे वैचला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी
प्रेमामृत खुण मागो त्या विलासी

माऊली सोपान काकांच्या अभंगाच्या या ओळी..

आज संत सोपान काकांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान झालं बगा. प्रस्थानायेळी ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत ह्यो वैष्णवांचा महामेळा  
पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला बगा. तर तिकडं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी लोनी काळभोरमधून निघून यवतमदी मुक्कामी आसनार हाय.  माऊली दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमदी मुक्कामी हाय. पालखी सासवडमदी आल्या आल्या माऊलींच्या पालखीचं जंगी स्वागत बी करन्यात आलं. वारकऱ्यांच्या पाहुनचारात सासवडकर तसुभरही मागे पडली न्हाई बगा. 

माऊली तुमास्नी दिलेल्या शब्दाप्रमानं घरबसल्या पालखीचं दर्शन तुमास्नी घडवनार हाय. आता बी म्या तुमास्नी घेऊन जानारेय माऊलींच्या पादुकांचं दर्शन घडवाया थेट सासवडमदी चला की जाऊया. 

माऊली संत सोपान काकांच्या पालखीचं आज  सासवडमधून प्रस्थान झालं.. यंदा या सोहळ्याचं 120 वं वर्ष आहे.. 13 दिवसांचा प्रवास करून ही पालखी 14 व्या दिवशी पंढरपूर मध्ये पोहोचते.. प्रस्थान झाल्यावर आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने

माऊली सासवडमध्ये पालखी आल्यानंतर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या असे आमदार संजय जगताप यांनी म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला जवळपास रात्रीचे साडे दहा वाजल्या वारकरी पालखी तळावर यायला वेळ लागला. याचसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. 

या वारीमंदी ही वारकरी वारीत कुठं बरं राहत असतील असा बी प्रश्न तुमास्नी पडला आसलंच.. चला तर मग तुमास्नी म्या घेऊन जानारेय वारीत... तिकडं शिवलीला पाटील तुमास्नी दावनारेय. चला

संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात माजी मंत्री विजय शिवतारे सहभागी झाले. काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात विजय शिवातरे देखील सहभागी झाले होते. पालखी सोहळा सासवड नगरीत येणे म्हणजे आमच्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचं म्हणाले बगा त्यांच्याशी संवाद साधलाय़ आमचा प्रतिनइधी जयदीप भगतनं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram