Majha Vitthal Mazi Vari : याची देही याची डोळा, आज माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान

Continues below advertisement

Majha Vitthal Mazi Vari : याची देही याची डोळा, आज माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान
आषाढी एकादशीसाठी वैष्णवांची मांदियाळी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वरवंड मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीने आज सोमवारी सकाळी प्रस्थान ठेवलं आहे. तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा उंडवडीमध्ये असेल. पाटसवरुन उंडवडीकडे जाणाऱ्या तुकारामाच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांना आज रोटी घाटातून जाण्याची जाण्याची पर्वणी असते. तर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज वाल्हे मुक्कामी असेल. एरव्ही तुकोबांच्या पालखीला फक्त दोनच बैलांच्या जोड्या असतात. आज मात्र या अवघड आणि नागमोडी वळणाच्या घाटातून जाण्यासाठी सहा बैलांच्या जोड्या या पालखीला लावण्यात आल्या होत्या. भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आणि फुलांनी सजवलेली तुकारामांची पालखी हे सगळं मोहक दृष्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola