Heavy Rain Alert | मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती, पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपलं
वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसानं तिघांचा बळी घेतला. वर्ध्यात दोघा चुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीत शुद्धित कोसळून एक महिला ठार झाली. वाशिम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांतील नद्यांना पूर आल्यानं शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. अकोल्यातील बाळापूर शहरात तीन नद्यांचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर, नांदेड, गोवा येथेही पावसाचा जोर कायम आहे.