Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिवे घाटातून पालखी मार्गस्थ, पंढरीची वारी Pravin Tarde यांच्यासोबत

Continues below advertisement

रामकृष्णहरी माउली.. 
म्या सिद्धेश ताकवले.. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत…
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग…
बोलतो पाषाणही तोची पांडुरंग…
माउली आज दोन्ही पालख्या पुन्यातनं आपापल्या मार्गाला लागल्या बगा. तुकोबांची पालखी आज लोनी
काळभोरमंदी मुक्कामी हाय तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमंदी मुक्कामी हाय.
आज दिवे घाटाचा अवघड टप्पा पार पडला बगा….ह्यो भक्तीचा नयनरम्य सोहळा डोळ्याचं पारनं फेडनारा
उर भरुन आननारा दिवे घाट पार करनं म्हंजी भक्ताच्या भक्तिची कसोटी पाहानारा क्षन..
मोठ्या संख्येनं असनाऱ्या जनसमुदायाचा एकत्र पायी प्रवास सोपा न्हाई माउली..  
लाखो वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला दिवेघाट. माउलींच्या पालखीच्या रथाशी नतमस्तक झाल्याचा भास व्हतुया. संपुर्न आसमंत इठुरायाच्या जयघोषानं व्यापून टाकलाया. निसर्गाच्या कुशीत वसलेला दिवेघाट वारकऱ्यांच्या रंगात रंगून अवघा विठुमय झाला बगा…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram