Majha Samvad : सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही : यशोमती ठाकूर Yashomati Thakur

Continues below advertisement

एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी माझा संवाद या विशेष मालिकेत.दिवसभर मंथन करणार आहोत. 

माझा संवाद या निमित्ताने मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद साधला त्यांनी अनेक गोष्टींवर आपलं परखड मतं मांडली. 

"सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. आपण सगळे एका महामारीला सामोरे जात आहोत. प्रत्येकानं कोणाला ना कोणाला गमावलं आहे. त्यामुळे ही वेळ राजकारण करण्याची नाहीच. आज एकच गोष्ट अपेक्षित आहे, आज मुख्यमंत्री आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे ते जे निर्णय घेत आहेत, ते सक्षमतेनं घेत आहेत. राजधर्माला अनुसरुन त्यांच्याकडून पॉझिटिव्ह निर्णय होत आहेत. मी ट्वीट केलं, ट्वीट तर आपण सगळेच करतो. त्यामुळे राजकारण तोडायचं आणि पाडायचं अशी भाषा कोणीच करु नये. आम्ही तर करुच नये पण विरोधकांनीही असा प्रयत्न करु नये.", असं यशोमती ठाकूर बोलताना म्हणाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram