Majha Samvad : राज्यमंत्री आता मंत्रीमंडळाचा भाग राहिलेला नाही : राज्यमंत्री बच्चू कडू Bacchu kadu

एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी माझा संवाद या विशेष मालिकेत.दिवसभर मंथन करणार आहोत. 

माझा संवाद या निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला त्यांनी अनेक गोष्टींवर आपलं परखड मतं मांडली. मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही. काही गोष्टी या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे. आंदोलन किंवा चळवळी या जिवंतपणा आणण्यासाठी कराव्या लागतात. जर प्रशासनावर अंकुश आणि सामान्य माणसांना लोकाभिमूख प्रशासन हवं असेल तर ही वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन करण्याची गरज असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola