खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही उंची गाठायला इतकी वर्ष का लागली, हा विचार करावा : Anjali Bhagwat

75 वर्षानंतर ऑलिम्पिक चांगल गाजलं आहे. आपल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मल्टी स्पोर्ट नेशन म्हणून या वर्षी आपण उतरलो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीवर नैपुण्य दाखवले आहे. काहींची पदकं ही थोडक्यात हुकली पण तरी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही  उंची गाठायला इतके वर्ष का लागले?  सिस्टीम म्हणून कुठे कमी पडलो यांची विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करणे सध्या गरजेचे असल्याचं मत माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.  एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola