Majha Maharashtra Majha Vision 2021 : लोकशाही आज ठोकशाहीकडे चालली आहे; Medha Patkar यांचं व्हिजन

Continues below advertisement

#MedhaPatkar #ABPMajha #MajhaMaharashtraMajhaVision

Majha Maharashtra Majha Vision : लोकशाही आज ठोकशाहीकडे चाललेली दिसत आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. मेधा ताई एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या. जयप्रकाश नारायण यांची चळवळ, दलित, आदिवासी, श्रमिकांच्या चळवळी महाराष्ट्रानं जवळून पाहिल्यात. समाज या चळवळीकडे कसा पाहतो यापेक्षा शासन याकडे कसं पाहतंय हे महत्वाचं आहे. कारण आता देशाला 75 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. या काळात जो काही संवाद जनता आणि सरकार यात होत होता, तो पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम केंद्रातील सरकारकडून होत आहे. म्हणून आज चळवळींना अवकाश मिळावा, चळवळींना लोकशाहीत स्थान मिळावं म्हणूनच चळवळ करण्याची गरज आज गरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना जाणवत आहे, असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. 

मेधाताई म्हणाल्या की, चळवळी हा एक स्तंभ आहे. ही एक लोकशाही मूल्याची चौकट आहे. मूल्यांच्या चौकटींवर नवीन धोरणांमुळं हल्ले होत आहेत. देशातील भूकेली, तहानलेली कष्टकरी माणसं चळवळींचा मार्ग अवलंबतील. मात्र त्या चळवळी दडपल्या जात आहे. जनचळवळींशी संवाद केंद्रीय सरकार संपुष्टात आणत आहेत. त्यासाठी ते कोरोनाचा वापर करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळे व्हायरस तेच सोडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

महापुरुषांची स्वप्न आपल्या सत्तेसाठी हे लोक धुळीस मिळवत आहेत. चळवळीशिवाय खरं राजकारण, समाजकारण चालू शकणार नाही. आताही काही आंदोलन स्वातंत्र्याच्या चळवळींसारखीच होत आहेत. यात काही जण हौतात्म्य देखील पत्करत आहेत. चळवळींनी व्यापक समन्वयाची दिशा स्वीकारली आहे.  आमचा स्वार्थ आमच्या समाधानात आहे. आम्ही आंदोलनजीवी आहोतच. कुणी त्याला शिवी म्हणून दिली असेल तरी ती आमच्यासाठी देणगीच आहे, असं मेधाताई पाटकर म्हणाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram