Majha Vision | कुटुंबासाठी कर्ज घेता, पण जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं : सुधीर मुनगंटीवार
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांसह राज्यातील 43 पैकी 38 मंत्र्यांवर कर्ज आहे. तुम्ही स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली. तसंच "राज्य सरकारची जबाबदारी शून्य असते हा नवा शोध लागला. ही अजब सरकारची गजब कहाणी आहे," अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केलं. सोबतच सरकारला अपमान करुन घ्यायची सवय लागली आहे, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement