Majha Vision 2020 | राज्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्देव : नारायण राणे

Continues below advertisement

केंद्राच्या संस्था नियमांप्रमाण कारवाई करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हात धुवुन मागे लागू अशा धमक्या देत आहेत. घटना जाणून घ्या, कारभाराची एबीसीडी यांना माहित नाही. महाराष्ट्र्रासारख्या प्रगत राज्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्देव आहे, असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.  एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजप खासदार नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) बोलत होते. तुम्ही गद्दारी करुन मुख्यमंत्री झाला आहात. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्याची भाषा करु नका, असंही ते म्हणाले. उद्धवस्त रस्ता न पकडता विकासाचा रस्ता पकडा. गोरगरीबांना तारण्याचं काम करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

सामनाचे मालक आहेत म्हणून सामनातून मुलाखत देऊन धमक्या देणं योग्य नाही, असं राणे म्हणाले. ते म्हणाले की, सरकारचं स्टेरिंग यांच्या हाती आहे असं ते सांगतात. त्यांच्या हाती गाडीचे स्टेरिंग आहे. ते ड्रायव्हर आहेत, पंढरपूरला जातात. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नकोय तर चांगला मुख्यमंत्री हवा आहे. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या मोठं होण्यात व्यक्तिगत काय योगदान आहे? असा सवाल देखील राणे यांनी केला.

#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram