Majha Maharashtra Majha Vision | लॉकडाऊनची वेळ येईल असं वाटत नाही ; आरोग्य मंत्री राजेश टोपे माझावर

Continues below advertisement
"कोरोनाला पूर्ण हरवायचं आहे, हा आपला उद्देश आहे. कोरोनाची लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही," असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय  17 हजार रिक्त जागा भरणार आहोत, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.

लॉकडाऊनमुळे सामान्यांचं आर्थिक नुकसान होतं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय आहे. गरज असेल तेव्हा करावाच लागेल. युरोपातील काही देशात लॉकडाऊन पुन्हा लागलं आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पिक येईल त्यावेळी लॉकडाऊन करणं भाग आहे. पण आपल्याकडे लॉकडाऊनची वेळ येईल असं वाटत नाही. सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील. संख्या वाढली तर या गोष्टींवर निर्बंध आणणं गरजेचं आहे. सरकार काळजी घेत आहे. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही," असं राजेश टोपे म्हणाले.

#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram