Flash Strike: मध्य रेल्वेच्या संपात दोघांचा मृत्यू, हायकोर्टात याचिका, 'अघोषित संपाविरोधात नियम बनवा'
Continues below advertisement
मध्य रेल्वे युनियनच्या अघोषित संपादरम्यान झालेल्या दोन प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे एका वकिलाने पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. 'कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात येणाऱ्या अघोषित संपाविरोधात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचे आदेश द्या,' अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि लोहमार्ग पोलीस यांना नोटीस बजावून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाई देण्याची आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी कालबद्ध चौकशीची मागणीही या याचिकेत केली आहे. हा संप मुंब्रा येथे जून २०२५ मध्ये झालेल्या अपघातात रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement